झर - झर - झर ओढिसि प्राणी ।
(चालः कशि मोहनी घातली गुरुनं..)
झर - झर - झर ओढिसि प्राणी ।
दे प्रेम मला जग - दानी ! ॥धृ०॥
की नये दया तुज आता ।
मंत्र देसि गर्भी त्राता ।
तरती जन तव नामांनी । दे प्रेम 0 ॥१॥
दसवे महाली तू वससी ।
गुण - ज्ञान- तार तू घेसी l
रमवी मम तव गुणि वाणी । दे प्रेम 0 ॥२॥
का कृपण असा झालासी ?
की कुठे झोपि गेलासी ?
बहु गेलो मी त्रासोनी । दे प्रेम ० ॥३॥
म्हणे तुकड्या दीनदयाळा !
दे तोडुनि माया - जाळा ।
तव कृपा करुनि घे ज्ञानी । दे प्रेम 0 II४॥