का अंत पाहसी सख्या ! रामराया रे !
(चाल: कशि फिरली हरीची मर्जी..)
का अंत पाहसी सख्या ! रामराया रे !
बा ! कृपण होउनी भक्त पाळिसी का रे ? ॥धृ०॥
जो दृढ भावाने शरण तुला गा ! आला I
करुनिया करंटा दरिद्री त्या बनवीला ॥१॥
हरि ! सांग ध्रुवाचे बरे काय रे ! केले ?
मातेचे दूध तोडुनी अधर बसवीले ॥२॥
रुक्मांगद राजा भला गाव ओस केला ।
फोडुनी पित्याचे पोट भक्त पाळियला ।।३॥
तो अंकित तुकड्यादास शरण तुज आला ।
तोडोनी भव - घर सारे, चरणी रतला ॥४॥