उखळाशी बांधिता तुला हरि ! नच वाटे शरम ।

(चालः भजा भजा गुरुराज सर्वदा..)
उखळाशी बांधिता तुला हरि ! नच वाटे शरम ।
फिरविशी की अमुचे कर्म ? ॥धृ0।।
असे भक्त तव सृष्टि भीतरी कोण करी गणती ?
कि ब्रम्हादिका   नसे   छाती ॥१॥
भक्तासाठी चक्र घेउनी भीष्मावरि जासी ।
बाजू     सारुनी     प्रतिज्ञेसी ॥२॥
मी पामर गुणहीन धर्महिन मतीहीन तुमचा I
सख्या रे  ! तारि बाळ साचा ॥३॥
तुकड्या बालक वर हा मागे, उध्दरि रे त्राता  !
कृपाळू खरा की गुणभरिता ! ॥४॥