का छळिसी मज अभक्त म्हणूनी तुझा रामराया !
(चाल: सदा तुझ्या चिंतनी रमावे..)
का छळिसी मज अभक्त म्हणूनी तुझा रामराया !
दया न करिशिल तर मग सर्वहि जाईल हे वाया ॥धृo॥
पतीतपावन नाम तुझे बा ! ऐकूनि मी आलो ।
चरणामृत सेविता सागरी पार न का झालो ? ।।१।।
तुझी पाहुनी अगाध लीला मजसि नवल वाटे ।
कसा तारिला वाल्मिक कोळी ? वाटे मज खोटे ॥२॥
तुझे म्हणविती असंख्य भक्तहि न वर्णवे कोणा |
तुका वाणि शाहणा, आणिला पंढरिचा राणा ॥३॥
काय सांगू भक्ताची करणी ? वैकुंठचि त्याला ।
तारि तारि हा तुकड्या जो भव- पाशी गुरफटला ।।४॥