हे दिनत्राता ! जगत -विधाता ! का बळकट बनला ?

(चाल: सदा तुझ्या चिंतनी रमावे..)
हे दिनत्राता ! जगत-विधाता ! का बळकट बनला  ?
कृपणपणे ही दावुनि माया, बुडविसि काय मला ? ॥धृ०॥
पतीत - पावन जाहिर झाला, आज कुठे लपला ।
अज्ञ बालका कृपा करिसि जव, शोभे नाम  तुला ।।१।।
उध्दव ज्याला म्हणती सारे, बोध तूवा केला ।
रुप   धरुनि   कश्यपू - घरी,   प्रल्हाद   राक्षियेला ॥२॥
एकचि भक्त अनेक रुपे घे, इतर का न तरला  ?
दास तुकड्या त्रासुनिया गा ! तव पदि लिन झाला ॥३॥