हरि तो दावा नयनि मला
(चाल: मज हे नलगे वैभव..)
हरि तो दावा नयनि मला ॥धृ०॥
मी तो पामर केवळ मतिहिन । कैसा जाणू प्रभू ! तुमची खूण ?
दे वरदान मला ।।१।।
कुठे राहतो कुणि मज सांगा । शरण मी जातो त्या पांडुरंगा ।।
होई प्रसन्न मला ।।२।।
बहू श्रमलो मी फिरता फिरता । कोणी न मिळे मजला त्राता ।।
घेईल पदरि मला ॥३॥
तुकड्यादास शरण तो गेला । पाजी त्याला सद्गुरु प्याला ॥
चरणी ठाव दिला ।।४॥