आली काय दशा, या भारत देशाला !

(चाल: हर हर बोलाना..)
आली काय दशा, या भारत देशाला !
कोण कुणाला रक्षि   कशाला ? ।। धृ०।।
नुरली मानवता परस्परांच्या पाशी ।
पर उपकार कसा, जरा कळे न कुणासी ।।
मतलबखोर असा मेळ जिवांचा झाला।
स्नेह     कुणाचा   नाहि     कुणाला ।।१।।
स्वार्थासाठी कसे मरमरती सरसरती ।
इंद्रीयलोलुपता जरा तरी   नावरती l
हिंमत नाहि कुठे सत्कार्यहि करण्याला ।
विरळा    असला    कोणि   निघाला ॥२॥
नव्हता काळ असा रामराज्य असताना।
दुःख न हे असता अशोक वा शिवराणा ।।
आजचि गणराज्या शाप कुणाचा आला ?
झाला ।    झाला   कळसचि    झाला।।३।।
सांगा या पुढती मार्ग जरा तरि कोणी।
कडयादास म्हणे बदला कर्म-कहाणी।।
प्रार्थवूया सगळे त्या जग-निर्मात्याला ।
अजुनि  न     आला   हे   बघण्याला ।।४।।