वाचे विठ्ठल गाईन नाचत पंढरी जाईन
वाचे विठ्ठल गाईन । नाचत पंढरी जाईन ॥ धृ ॥
ऐसे आहे माझ्या मनी । लोळेन संतांच्या रजकणी ॥ १ ॥
रंग लावीन अंतरा । हरुनी देहभाव सारा ॥ २ ॥
तुकड्या म्हणे होईन दास । देवा! पुरवा इतुकी आस ॥ ३ ॥