जया प्रिय नाही सखा भगवन्त
जया प्रिय नाही सखा भगवंत ।
नावडे अत्यंत धनी कोणी ||धृ ||
तो वैरी आमुचा न भजे जो देवा ।
त्यागू जीव भावा त्यासी आम्ही ||1||
जरी मित्र गोत होय या देहाचा ।
तरी काय त्याचा रंग आम्हा ? ||2||
तुकडयादास म्हणे तो जीव आमुचा ।
ज्याची काया वाचा देवापाशी ||3||