होईल जेणे बरे तोचि संग धरी

होईल जेणे बरे तोचि संग धरी । 
आणीक न करी व्यवसाय ॥धृ॥
जरी नारायणा अंतर ते पड़े । 
वारावे बापुडे मायबाप ॥1॥
गुरुचेहि वाक्य तोडावे ते वेळी । 
मूर्ति ती सावळी अंतरते ॥2॥
म्हणे तुकड्यादास सोडावा तो देह । 
जेणे न संदेह तुटो लागे ॥3॥