विक्षिप्त का चित्ता हौशी क्षणोक्षणी

विक्षिप्त कां चित्ता ! होसी क्षणोक्षणी ? 
काय तुज उणी वाटलीसे ? ॥धृ॥
बाह्यरंग सोडी घरी अंतरंग । 
राही तू निःसंग आत्मज्ञाने ॥1॥
आवरी ही वृत्ति झाली जी विषयी । 
जाई संतापायी बोधावया ॥2॥
तुकड्यादास म्हणे सर्व सुख पावे । ज्ञानियांच्या सवे आत्मलाभ ॥3॥