तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सुख सज्जनाच्या सवे
सुख सज्जनाच्या सवे ।
परी आघाते पावावे ॥धृ॥
दुःख दुर्जनाच्या संगे ।
पाप भरलिया भोगे ॥1॥
कीर्ति पावे कीर्तिवंत ।
सोसी जनाचे आघात ॥2॥
तुकड्या म्हणे नम्र संतीं ।
त्याची अखंड सुमती ॥3॥