तुझी भक्ति करु दे श्रीगुरु !

( राग : तेलंग , ताल : त्रिताल )
तुझी भक्ति करु दे श्रीगुरु ! 
पट खुलतील , तिमिरांधाचे ।
प्रकाश मग प्रगटे  स्वरुपाचे ॥धृ०॥ 
ज्ञानांजन येईल नेत्रा मग । 
विसर पडे विषयाची ही रग । 
काम - क्रोध सगळे   हरु  दे ! ॥१॥ 
अविरत सेवा घडे जिवाला। 
तरिच सुखाचा धनि तो झाला । 
म्हणूनिच अनुभव हा भरू दे ॥२।।
विसरून जाईल तो न आमुचा । 
जो जाणे तो सखा जिवाचा । 
तुकड्याचे हृदयात स्फुरू दे ! ॥३॥