चलाना , चलाना अपुल्या देशी चलाना ।
( चाल : बजादे , बजादे तेरी बन्सी . . )
चलाना , चलाना अपुल्या देशी चलाना ।
बघाना , बघाना मुळची ज्योति बघाना ॥ध्रु॥
सर्व मानव एकची , मग जाति - पाति कासया ?
एकची आम्ही , अलग उद्योगी म्हणाना ॥१॥
एक आत्मा , एक ईश्वर , एकची नर - देह हा ।
जाणे एकची मार्गे , मग हे का न म्हणाना ! ॥२॥
राज्य हे परकोट अमुचे , आज तरी मानू तसे ।
भारताचे पुत्र तरी , आपुल्यासी म्हणाना ॥३॥
समज येता विश्वहि अपुले म्हणाया घेऊया ।
आज तरी हे एवढे , अपुल्याशी गणाना ॥४॥
दास तुकड्या सांगतो , ही महानता सोडू नका ।
यातची धर्म सगळा , म्हणुनिया जगाना ॥५॥