सदा उफाळते मन I कधी पाहीन चरण
सदा उफाळते मन । कधी पाहीन चरण? ॥ धृ ॥
कोण नेई पंढरीसी । विठ्ठलाच्या दर्शनासी? ॥ १ ॥
जीव झाला उतावीळ । क्षण जाईनाचि काळ ॥ २ ॥
तुकडयाम्हणे काय करू?। कैसा देवा हाक मारू! ॥ ३ ॥