सखा रूक्मिणीचा वर । पाहो कधी डोळेभर
सखा रुक्मिणीचा वर । पाहो कधी डोळेभर ॥ धृ ॥
ऐसे झाले माझ्या जीवा । आस पुरवावी केशवा! ॥ १ ॥
जगणे तुझ्याविण शीण । वाटे मना उदासीन ॥ २ ॥
तुकड्या म्हणे जातो क्षण । होय आयुष्य खंडण ॥ ३ ॥