वाटे कधी कधी जाऊ I देव डोळियांनी पाहू
वाटे कधी कधी जाऊ । देव डोळियांनी पाहू ॥ धृ ॥
ऐसे झाले माझ्या मना । भेट देई नारायणा! ॥ १ ॥
नको ठेूवू हे अंतर । दुःख वाटे ज्याने फार ॥ २ ॥
तुकडया म्हणे दे दर्शन । नको जाऊ देऊ क्षण ॥ ३ ॥