तुज आळवावे मनी ।
तुज आळवावे मनी । बसवूनिया हृदयस्थानी ॥ धृ ॥
जेथे द्वादशदल कमल । अति स्थान ते निर्मल ॥ १ ॥
शुद्ध एकांतीची पूजा । तेथे ऐकू कथा तुझ्या ॥ २ ॥
तुकड्या म्हणे ऐसे घडो । ध्यानी ध्याता देह पडो ॥ ३ ॥