कोण तुझा वाली , कोण करतो सांभाळ ।

( चाल : ओ काली टोपीवाले तेरा नाम तो . . . ) 
कोण तुझा वाली , कोण करतो सांभाळ । 
कोणा बुध्दी झाली,   तुझी    चालवाया   माळ ॥धृ०॥ 
कोण तुझा धर्मगुरु सांगतसे ज्ञान । 
कोण तुझा दिक्षा - गुरु शिकवीतो ध्यान ।। 
कोणता सद्गुरु, तुझा  टाळतसे   काळ ।। कोणा0 ।।१ll
कोणाच्या संगतीने शिकला उद्योग । 
कोणी कला - कौशल्याचा लावियला रंग ।। 
कोणाच्या भरोसे , सर्व   ठेवतसे   बळ ।। कोणा0 ।।२।। 
कोणत्या देशात तुझा होतसे निर्वाह । 
काय तुझी सेवा त्याला देतसे उत्साह ।। 
कोण देतो अन्न - वस्त्र, राहण्यासी चाळ ।। कोणा० ॥३॥ 
सर्वांची आठवण, हीच वाच पोथी । 
जाग इमानासी सर्व सोडूनी दुर्मति ।। 
सांगे तुकड्यादास, जपी अंतरीची माळ ! | | कोणा० ॥४॥  खोपडा , दि . १३ - १० - १९५९