तन्मय होउनी शरण तुला मी

( चाल : राधा गौळण . . . ) 
तन्मय होउनी शरण तुला मी , नश्वर देहा घे प्रभू कामी ॥धृ०॥ अगणित अपराधे जरी घडली । तव दर्शन घडताचि उडाली ।। बोध तुझा भवतारक सगळ्या, तरतिल दर्शनिही खल-कामी।। १।। 
जोवरि बोध जिवा नच झाला । तोवरि हा यमफासची त्याला । सद्गुरुची निज कृपा प्रकटता , उध्दरलो वाटे मज स्वामी ।।२।। 
सत्गुण गंगा तव सत्संगा । तीर्थ - जलाने होती अभंगा ।। तुकड्यादास म्हणे तव कीर्ति, सांगति वेद - पुराणे नामी ।।३।l 
                                    ब्रम्हपुरी , दि . ०९ - ०९ - १९५८