हास हास रे मुकुंदा !
हास हास रे मुकुंदा! । गोप गोपींच्या सुहृदा ! ॥ धृ ॥ बैस माझे डोळियाशी । नको दुरावू हषिकेशी ! ॥ १ ॥
बघू दे हे सगुणरूप । मुरवू दे मनिचा संकल्प ॥ २ ॥
तुकड्या म्हणे इतुके करी । नित्य राही तू अंतरी ॥ ३ ॥