अमुचे मन सुंदर ठेऊ

( चाल डोले मोडीत राधा चाले . . . ) 
अमुचे मन सुंदर ठेऊ । अम्हि सर्व सुखाला पाहू हो ! ।।धृ०।। 
श्रम - कष्टाने उपजवू शेती , सर्व मिळोनी जगु त्यावरती । 
फुकट न कुठचे खाऊ हो ! । । अमुचे मन०।।१।। 
सर्वांचे कल्याण असावे , चिंतू अम्हि सर्वचि जिवभावे । 
नीच - ऊच नच साहू   हो ! । । अमुचे मन ।।२।। 
एकाने दुसऱ्या शिकवावे , सर्व मिळोनी शहाणे व्हावे । 
आनंदे , नाचू   गाऊ   हो  ! ।। अमुचे मन ॥३॥ 
धन सर्वांचे , ऋण सर्वांचे , बल सर्वांचे , स्थल सर्वांचे । 
निश्चय हाची निभऊ  हो ! ।। अमुचे मन ।।४।। 
तुकड्यादास म्हणे मानवता , हीच आमुची विश्वदेवता । 
अंती तिला लीन होउ हो  ! ।। अमुचे मन ।।५।।