करि स्मरण हरीचे आता रे !

(चाल: जिवलग गुरुविण कोणि न..)
करि स्मरण हरीचे आता रे  !
काहितरी मी पाप कराया, खळ काळ उभा माथा रे 0।।धृ0।।
सुंदर काया दिली हरीने I
जाइल केव्हा, स्मरणचि नेणे ।
व्यर्थ गर्व का धरिता    रे ! करि स्मरण 0 ।।१।।
सोडि सोडि विषयांची आशा ।
होइल अती परम निराशा ।।
षड़विकार हरि मिथ्या   रे ! करि स्मरण 0॥२॥
करि विचार तू,कोण तुझा रे !
नाशिवंत सुख हे समजा रे !
धरि गुरू - चरण चित्ता रे ! करि स्मरण 0 ॥३॥
सोडूनि द्या ही विषय - वासना I
सदा करा रे ! गुरु - उपासना ॥
तुकडया म्हणे तो दाता रे ! करि स्मरण 0 ॥४॥