तव स्वरुप कसे चांगले, अनुभवा आले, कळे मग तुजला ।

(चालः भटकला कितिक भटकसी..)
तव स्वरुप कसे चांगले, अनुभवा आले, कळे मग तुजला ।
जाशिल गुरु-चरणी, सेविशील जव प्याला  ॥धृ०॥
मन ठेवी ब्रह्मानंदी, तू रे  !  स्वानंदी, अनुभवि होसी ।
नम्रता धरुनिया गुरु - कृपेने तरसी ।
जग दुःखरुप डोंगर,अशाश्वत भार, घेउनी शिरी ।
गमविसी व्यर्थ ही योनी, बनसि भिकारी ।।
म्हणे तुकड्यादास अदभूत, करणी अघटित, तया श्रीहरिची ।
ती पहा पहा हो नयनि लहर प्रेमाची  ॥१।।