घे सत्य भाक रे ! माझी । फेरि चुके जन्ममरणाची
(चाल : दिसतो हरी हा भोळा .. )
घे सत्य भाक रे ! माझी । फेरि चुके जन्ममरणाची ॥धृ०॥
चौऱ्यांशी भोगित आला ।
जा अजुनिहि शरण गुरुला ।
स्वारि येई त्वरित यमाची । फेरि चुके 0 ॥१॥
करि दूरचि विषय-विकारा ।
धरि सोय ज्ञान - गंभीरा !
करि सेवा पूर्ण संतांची I फेरि चुके 0 ॥२॥
धरि ध्यान निरंतर हरिचे I
करि मन एकांती साचे I
प्रभू - गुण गाउनिया नाची I फेरि चुके 0 ॥३॥
जग वरचे मिथ्या जाणी I
परमेश्वर सत्यची मानी I
तुकडया म्हणे आण गळयाची I फेरि चुके 0 ॥४॥