असेल मुखाने शास्त्राचे पठण
असेल मुखाने शास्त्राचे पंठण |
तरी आाचरण दुर्लभ त्या ॥धृ॥
बोले तैसा चाले त्यासी मिळे मान ।
आणिकासी जन ना पुसती ॥1॥
कार्याकार्य सूत्र-व्यवस्था लावणे ।
गुरुकृपेविणे कोणा न ये ॥2॥
तुकड्यादास म्हणे उमटे शरीरी ।
ज्ञानी दिगंतरी तोचि एक ॥3॥