वेदवाक्य हे तो सांगितले देवा

वेदवाक्य हे तो सांगितले देवे । 
परि गुह्य ठावे नाही सर्वा ॥धृ॥
औषधीचे वाण मिळती दुकानी । 
रोगांचे निदान न कळे त्यांना ॥1॥
तयासी पाहिजे कृपा ईश्वराची । 
लावावया त्यांची सोय सर्व ॥2॥
तुकड्यादास म्हणे भक्ति नाही जया ।
देवाचीही दया नोहे त्यासी ॥3॥