कसाया वाचता भाराभर पोथी

कासया वाचता भाराभर पोथी । 
कांही नये हाती गुरुवीण ॥धृ॥
शास्त्र हे दुकान बहुत सामान । 
रोग ओळखोन कोण देई ? ॥1॥
रोग आहे दुजा औषधी घे न्यारी । 
तयाने बिमारी टूर नोहे ॥2॥
तुकड्यादास म्हणे संतसंग करा । 
नीट मार्ग धरा परमार्थांचा ॥3॥