सतसंगा वीण न कळे निजज्ञान
संतसंगावीण न कळे निजज्ञान ।
वर्म हे कठीण परमार्थाचे ॥धृ॥
धरावि आवडी संतसंँगासाठी ।
दृढ द्यावी मिठी पायी त्यांच्या ॥1॥
गुह्याचेहि गुह्य सांगतील संत ।
धरोनी अनंत बोधी देती ॥2॥
तुकड्यादास म्हणों शुद्ध संग करा ।
मायीक विचारा सारोनिया ॥3॥