संतांचे वचन ऐकावे श्रवणी
संताचे वचन ऐकावे श्रवणी ।
दृढवावे मनी मननासी ॥धृ॥
करिता मनन वाढवावा ध्यास ।
करोनी अभ्यास अहोरात्र ॥1॥
अभ्यासे पावेल इंद्रिया वळण ।
देह हा पावन होय तेव्हा ॥2॥
तुकड्यादास म्हणे होय साक्षात्कार ।
यालागी निर्धार संती धरा ॥3॥