सेवी हरि - चरणाचा प्याला ।

(चालः निर्भयपद आनंद निरंतर..)
सेवी हरि - चरणाचा प्याला ।
ज्या चरणाने प्रल्हाद तरला ।।धृ०।।
मानुज-जन्म नये कधि पुन्हा ।
माग गुरुसि अजरामर पान्हा ।
नातरि        व्यर्थचि    गेला ॥१॥
संतसमागम करी त्वरित रे  !
फिटेल लौकर तुझी भ्रांत रे !
प्रपंचि का   रे  !  भुलला ? ।।२||
क्षण भंगुर ही नरतनु प्राण्या !
उपाय करि रे ! आजचि शहाण्या !
रत हो      गुरु -  चरणाला ॥३।।
रामनाम नित सेविसि जरि तू ।
तरशिल सत्यचि भवसागरि तू ।
अहंपणेच           बुडाला ।।४॥
यम मारील घरावरि डाका ।
मारशील कोणा मग हाका ?
तुकड्या म्हणे जप  माला ।।५॥