राम जयाचे हृदयी राहे, त्यास भिती कवणाची हो ?

(चाल: उठा गड्या ! अरुणोदय... )
राम जयाचे हृदयी राहे, त्यास भिती कवणाची हो ?
अशाश्वता टाकुनी दृष्टि घे, सर्व     सत्यस्वरुपाची  हो ! I|धृo॥
पाच विषय ते दूर लोटुनी, निवृत्तिमध्ये राही हो !
काम-क्रोध-मद सर्वहि टाकी, संता शरण तू    जाई  हो ! ॥१॥
नौका तीच तुला तरण्याची, त्वपंद-तत्पद पाही हो !
साधन हेची, गुरुकृपा  घे,   लक्ष्यअलक्ष्यी    राही   हो  ! ।।२॥
अघटित करणी ज्या रामाची, उभाचि भक्तासाठी हो  !
तुकड्याबालक शरण तयाला, आवड चरणी मोठी हो ! ॥३॥