रत हो मना ! राम - गुण गाई

(चाल: जगमें हीर मिलत..)
रत हो मना ! राम - गुण गाई ।
पुढती निज-सुख पाही ॥धृ०॥
स्थळि न उभा रे ! का फिरसी बहु ?
अंति पडसि मग डोही  ॥१॥
धरी नम्रता हृदयी आता,
शांतवृत्ति      सुखदायी ॥२॥
अघटित करणी संत पदाची,
चरणी   जाउनि    राही ॥३॥
नश्वर हे तुज दिसते सारे,
धरी स्वरूप   लवलाही ॥४॥
तुकड्यादास सांगतसे गुज,
सोय    गुरुविण   नाही ॥५॥