सुखाचे सारथी जग हे
(चाल: मनाला स्थीर करवाया..)
सुखाचे सारथी जग हे, भुले का यास पाहोनी ? ॥धृo॥
बगीच्या करुनि देवाने दिला स्वाधीन त्रिगुणांचा ।
कितिक उत्तम कितिक मध्यम, पहा ऐसी मजा कोणी ॥१॥
एक तो रत्न बगिच्यात, करी निर्माण कृष्णसुत ।
वदावे काय गुण त्याचे ? कुठे जाई न मोहोनी ॥२॥
असुनि अनमोल जीवन ते , घालविसि काय वायार्थे ?
म्हणे तुकडया न कोणि तिथे , रुप अद्वैत ! जाणी ॥३॥