श्रीहरि कृपाळू आहे

(चाल: चल ऊठ भारता ! आता..)
श्रीहरि कृपाळू   आहे ।  पाहतो    दास    लवलाहे ।।धृ०।।
वारिले बहूत  हो  !  क्रोधी । ना आज कुणाची छाती ।।
ज्या नसे लीनता काही ।  तो नर व्यर्थचि बा  !  जाई ।।१।।
बहू झाले शहाणे आता ।  ना कुणी शरण रघुनाथा ।।
सोडूनि लीनता खासी ।  नच धरी अहंकारासी ।।२।।
भक्तांची करणी ऐसी ।  तव माय दयाळचि तैसी ।।
करिल तो श्रीहरी करुणा  I  जाळील  सर्व    पापांना ॥३॥
जरी पडले पर्वत भारे ।  नामाने जळती सारे ।।
तुकड्या वदतो हो  !  साचे  ।  ना बोल आजकालाचे ॥४ll