करि भजन सख्या ! हरिचे रे !
(चालः चले ऊठ भारता ! आता..)
करि भजन सख्या ! हरिचे रे ! जन्माचे चुकतिल फेरे ॥धृ॥
बहू पहाड-सांगर फिरतो, जा शरण सद्गुरुला रे !
अवचित हा देह मिळाला, अशि पुन्हा न ये वेळा रे !
करि साधन ऐसे आता ।
हृदयी ये पंढरिनाथा ।
हो सावध बा गुणवंता ।
करि घेई विणा गित गा रे ! जन्माचे 0।।१।।
नामघोष करिता करिता, ध्वज लावी नामाचा रे !
तारिले भक्त किति पाही, अजुनि का न जागृत बा रे !
ध्रृव तो अढळपदि बसला, प्रल्हादभक्त तरला रे !
साधन ते सोपे बापा !
मार्ग जाण तो सोपा ।
कोणी नच करिती मापा ।
का भ्रमसी चारि दिशा रे ! जन्माचे 0 ॥२॥
बा ! शरण गुरुला जाई, रघुनाथ झणी भेटे रे !
का फिरसि असा दिनरुप, गुरु आडकुजी-खुण घे रे !
ठेवी लक्ष्यालक्ष्य संधान ।
जगि रहाट रात्रंदीन ।
करि सदाचि सोहंस्मरण ।
तुकड्यासि ठाव दिधला रे ! जन्माचे ०॥३॥