सदभावे निजभजन करी । प्रकटे हृदयी गिरिधारी
(चालः चल ऊठ भारता ! आता..)
सदभावे निजभजन करी । प्रकटे हृदयी गिरिधारी I।धृ॥
तव देहचिन्ह बाहेरी । पालटे क्षणा माझारी ।।
ऐकोनि बोध संतांचा । स्वेद अंगि जल ये नेत्री ।।
चैतन्याचे संवादी । वैराग्य प्राणजय भारी ॥
आनंद न माये कंठी ।
रोमांच शरीरी दाटी ।
लागे उन्मनिची दृष्टी ।
स्मरताचि होति प्रभु सारी । प्रगटे हृदयी 0 ॥१॥
निर्लज्ज होउनी लोकी । हरिचिंतन हृदयी राखी ।।
नामामृत - गोडी चाखी I कामकृोधउर्मी टाकी ॥
चार नारि पोरपणा की I जा झरझर उन्मनि - अंकी ॥
तुकडया वर हाची मागे I
राहिन आडकुजी - संगे I
प्रभू - चरणी मन हे रंगे I
धावुनि मग भय तो वारी I प्रगटे हदयी 0 ॥२॥