वैराग्य कोठवरि राहे ?
(चाल : राजहंस माझा निजला..)
वैराग्य कोठवरि राहे ? वनितांची दृष्टि न साहे ॥धृ0॥
कुठवरि जंबुक कल्लोळ ? ना पंचानन विक्राळ ||
सागरा उमाळा कोठे ? ऋषि अगस्ति ना जव भेटे ।।
कुठवरी मित्र - संवाद !
जोवरी न मरणस्वाद ।
रणभूमि न घुमवी नाद ।
विश्वास तोवरिच राहे । वनितांर्ची दृष्टी न साहे ॥१॥
गांजिते दुःख कवणा बा ? ना आत्मप्रकाशी राबा ।।
कुठवरि इंद्रिय तनु गांजी ? ज्ञानप्रभा जोवर वांझी ।।
कुठवरी शिष्य - संवाद ? ना स्थिती विदेही साध्य ।।
काधि भेटे पांडुरंग ?
मनि झाला हो ! सत्संग ।
चढला भक्तीचा रंग ।
मग वृत्ति मोकळी वाहे । वनितांची दृष्टि न साहे ।।२॥
कर-लेक बंधन केव्हा ? हे जग मायेचा पोहा ।।
कुठवर ह्या महाल माङ्या ? जोवरि ग्रह-फेरा न गङ्या !
भय कोठवरी मृत्यूचे ? ना तत्त्व कळे जीवनाचे ।।
मित्रता धरी सत्त्वाची ।
तुकडया हरी - भजनी नाची I
आज्ञा गुरू आडकुजीची I
करि भजन हरीचे पाहे I वनितांची दृष्टि न साहे ॥३॥