अवर्णनीय ऐसा तुझा गा !


अवर्णनीय ऐसा तुझा गा ! महिमा । वदताचि नामा तरे पापी ।
काय मी अज्ञानी वर्णू तुझे गुण? । मायेचे संघान नाही जेथे ||
नेति-नेति ऐसी बोले वेद श्रृति । मूर्खाचिये मती काय लागो ?॥
तुकड्यादास म्हणे न कळे ते ज्ञान । दुरूनी नमन तुज माझे ॥