अगाध नमो गणनाथ !

अगाध अगाध नमो   गणनाथ ! । अवतरोनि पंथ वाढविला ।।
अष्टदासी तुझ्या लोळती चरणी । नाम घेता हानी अज्ञानाची ॥
अल्पमती माझी, हृदयी बैसोनी । बुद्धि देई मनी   स्वरूपाची ।
म्हणे तुकड्यादास कृपा करी आता । सख्या जगत्राता ! गणाधीशा ! ।।