ईश्वर तू माझा सर्व बुद्धिदाता
ईश्वर तू माझा सर्व बुद्धिदाता । विघ्ननिवारिता गणनायका ।
तुझिया कृपेने उडते अज्ञान l धरावे चरण एैसे वाटे l
ब्रह्मविष्णु तेही देती मान तुज । तारी हा सहज दीन आता ॥
मंगलनिधाना नमो गण्पनाथा ! । ठेवी चरणी माथा तुकड्यादास ॥