औट हात देह तारी तारी माझा

औट हात देह तारी तारी माझा । येई येई काजा धावृनिया ।
माय सरस्वती ! बाप गजानन । भक्तांचे कारण  अवतरले ॥
ब्रह्मादिक तेही मान देती जिसी । रंग गायनासी आणी आता।।
वेदमाते ! दास उद्धरी त्वरीत । अंत का पाहत ? तुकड्या म्हणे ।।