ऋन झाले शि री पापाचे ते फार

ऋण झाले शिरी पापाचे ते फार । काढी गे ! सत्वर माय ! आता ।।
देई बुद्धी मज तुझे गुण गाया । जिव्हाग्री बैसाया येई  माते ! ।।
धन्य मी मानीन देह तव  पायी । येई   लवलाही   रंगणी  वो ।।
म्हणे तुकड्यादास नाही तालसूर । अज्ञाने पामर अंघ झालो ।।