अंबिके ! धाओनी देई बुध्दी
अंबिका
अंबिके ! धावोनी देई बुद्धी माय ! । दावी आज पाय मला वेगी ।।
रंगणी येवोनी रंग आणी आता। तव नाम गाता धन्य होई ॥
काय मी पामर आळवीन तुज? । भक्तालागी गुज देई माते ! ।।
पाजी प्रेमपान्हा म्हणे तुकड्यादास । तारणे भक्तास हाचि धर्म ।