सख्या सावळ्या सगुणा I
सख्या सावळ्या सगुणा । अगा रुक्मिणी रमणा ॥ धृ ॥
तुझे पाहू दे श्रीमुख I
लाभे ब्रह्मांडीचे सुख ॥ १ ॥ तुझ्या रुपाचा प्रकाश I. करी अज्ञानाचा नाश ॥ २ ॥
तुकड्या म्हणे विटेवरी I. उभा सावळा मुरारी ॥ ३ ॥