सगुण सावळ्या घनश्यामा I
सगुण सावळ्या घनश्यामा ! । तुझा लागो देई प्रेमा ॥ धृ ॥
ध्यानी मनी तुझी मूर्ति । देई मनासी विश्रांति ॥ १ ॥
मना नावडते काही । तुझ्याविण दुःख राही ॥ २ ॥
तुकड्या म्हणे सर्व जावो । माझा राधा-कृष्ण राहो ॥ ३ ॥