श्रीकृष्ण सांगती अर्जुनासि सार
श्रीकृष्ण सांगती अर्जुनासी सार ।
कर्मभूमी पार येणे होते ॥धृ॥
करोनी प्रपंच सावधान-रीती ।
बांधू नये मती प्रपंच्यासी ।।1॥
आत्मा हा निराळा आहे सर्वाहूनी ।
सर्वांसी वेष्टुनी असोनिया ॥2॥
हे वर्म जाणोनी वागावे निश्चयें ।
रहावे निर्भय कर्मभूमि ॥3॥
तुकड्यादास म्हणें हाचि घेतां सार ।
भवाचीये पार पार्थ झाला ॥4॥