असत्य हे जग देह धन दारा

असत्य हे जग देह धन दारा । 
तेथूनी माघारा वृत्ति घेई ॥धृ॥
सुख नाही नाही ऐसियांच्या सवे  । 
हे वर्म केशवे बोलियेले  ॥1॥
बोलियेले वर्म उद्धवा लागोंनी । 
तेणे सकळ जनी लाभ झाला ॥2॥
तुकड्यादास म्हणे लाभ झाला तया । 
गाती पंढरीराया  सद्धावाने ॥3॥