गुरु शिष्य दोन्ही लागले मंथनी
गुरु शिष्य दोन्ही लागले मंथनी ।
काढियले लोणी भक्ति सुख ।।धृ॥
तत्व-ज्ञानावरी भक्ति ही सुरस ।
प्राप्त होय रस भाविकासी ॥1॥
घेता भक्तिरस पाळोनिया पथ्य ।
दोषांचे आपत्य जळुनी जाई ॥2॥
तुकड्यादास म्हणे सेविता नवनीत ।
दोघेही पुनीत अमृत झाले ॥3॥