ऐका ऐका उपदेशी

ऐका ! एका उपदेशी । 
लाभ पावतो सर्वांसी ॥धृ॥
ऐसा करोनिया प्रश्न । 
चित्ती व्हावे सावधान ।।1॥
करु नये काथ्याकूट । 
प्रसंग होतसे वाईट ॥2॥
तुकड्या म्हणे रंग आला । 
लाभे लाभ दुणावला ॥3॥